गुलबाकवली, गुलबकावली, गुल-ए-बकावली या वेगवेगळया नावांनी ओळखली जाणारी अरेबियन नाईट्ससारख्या सुप्रसिद्ध कथांच्या समृध्द शृंखलेतीलच दर्जेदार, रहस्यकथा आहे.‘गुलबकावली’ची गोष्ट तर थोडी चमत्कारिकच आहे. तिची बालवाङ्मयात ज्यानं नोंद केली त्याला वंदन!
अनेक लेखकांनी आणि प्रकाशकांनी ही गोष्ट लिहिली/प्रकाशित केली आहे. प्रत्येक आवृत्तीत मनसोक्त बदल केले आहेत. कथेचा नायक ताज-उल्-मुल्क जिच्या प्रेमात पडतो ती गुलबकावली इंद्राच्या दरबारातली अप्सरा आहे. तिच्या नात्यातल्या वर्तुळातल्या स्त्रियांची नावं विविध धर्मांतली आहेत. विविधतेत एकता किंवा सर्वधर्मसमभावाचा अजाणता झालेला हा पहिला प्रयत्न असावा!
मुळ पर्शियन भाषेतील ही रहस्यकथा लेखक शेख इझ्झातुल्लाह बंगाली यांनी इ.स.16O5 मध्ये लिहीली होती. (गुल-ए-बकावली शैख़ इज़्ज़तदुल्लाह बंगाली मुंशी नवल किशोर, लखनऊ यांनी1954 मध्ये पुनर्प्रकाशित केली.)ज्याची नहल चाँद लाहोरी यांनी उर्दूमध्ये भाषांतर केले.
भारतात उत्तम लोककथा, दिर्घकथा म्हणूनही गुलबकावली प्रसिध्दी पावली.आम्ही लहान असतांनी आजोबा गुलबकावलीची गोष्ट सांगत तेंव्हा संपुर्ण गावही गोष्ट मन लावून ऐकायचा कथाकथन पद्धतीत निष्णात असलेले आजोबा कथेला गोष्टींना अक्षरशः Visually Science Fiction चं मूर्त-अमूर्त रूप द्यायचे. विलक्षण पात्रांनुरूप आवाजांची मिमिक्री करणारे आजोबांना आम्ही या गुलबकावलीच्या गोष्टींसाठी हट्ट करायचो. खुपच दीर्घ असल्याने गोष्टीत बऱ्याचदा अध्र्या तासातच आम्ही झोपी जायचो. त्यामुळे कित्येक वर्ष आम्हाला या कथेचा शेवट काय याचीच माहिती नव्हती.
ती खरेच दर्जेदार कथा होती. त्यावेळी आजच्यासारखे प्रसारमाध्यमं नव्हती त्यामुळे खुप मोठा वाङमयीन, साहित्याचा खजाना माझ्या वडिल, आणि आजोबांसमवेतच मातीत गडप झाला.
नंतर महत्प्रयत्नांनी मला एके ठिकाणी गुलबकावलीचा मराठीत अनुवाद केलेले पुस्तक आमुच्या काकांकडे वाचण्याचा योग आला.
इसापनीतीच्या गोष्टीच्या धरतीवरच गुलबकावली ही पितृसेवेची कथा म्हणून ग्रामिण भागात कालपरवापर्यंत पोतराज मंडळी सांगायची, संस्कृतीची जपवणूक करणेसाठी, संवर्धनासाठी अशा लोककलांना आणि पर्यायाने लोककलावंतांना लोकाश्रय मिळणे गरजेचं आहे.
जागतिक घडामोडींनाही या कलेवर दूरवर परिणाम केलेले आहे. आजही देवदिकांच्या,सूरअसूरांच्या, महान साधूसंताच्या, विचारवंतांच्या, शूर मर्द मराठी महापुरुषांच्या इतिहासाची जपवणूक व शिकवणूक इथल्या मातीतल्या हाडाच्या कलावंताच्या कलांनी केलेली आहे.
गोंधळी,भारुड,पोवाडे,लोकगीते,तमाशातील वग, गवळणी, अभंग, गाथा,कथा,कादंबऱ्या,गोष्टी,पोथी,पुराणे,पारायणे, शिलालेख, ताम्रपट, किल्ले, मंदिरे, विहारे, घरे यांसारख्याच गोष्टीमधून तत्कालीन, प्राचिन परिस्थिती जीवंत उभी राहते.
गुलबकावली ही कथा माझी आवडती होती तिच्यातला थरारक, रोमांचकारी प्रसंगांमुळे. ऐकत असताना अक्षरशः शहारे यायचे. माझ्यामते माझ्या आजोबांइतकं त्या गुलबकावलीवर कोणीच इतक अस्सिम आणि निस्सिम प्रेम केलं नसेल. तिच्या खऱ्या अर्थाने त्यांनीच न्याय दिला होता हे माझे स्पष्ट मत आहे. याच प्रकारे आमुच्या तालुक्या शेजारचे ख्यातनाम लोककलावंत मनोजजी भडकवाड यांचेही गुलबकावलीचे फुलनावाची लोककथाही प्रसिद्ध आहे.
https://youtu.be/DD7xrTDEjzgस्वातंत्र्यपुर्व भारतात गुल बकावली चित्रपटाच्या रूपाने (गुल-ए-बकावली) १९३९ मध्ये पंजाबी मध्ये निर्माता डी. एम. पंचोलीपडद्यावर सादर केला.नंतर १९६३मध्ये निर्माता दिग्दर्शक : जुगलकिशोर यांनी हिंदी मध्ये बनविला.
https://youtu.be/VD-iqEuV_00खरेतर गुलबकावली हे एक औषधीफुल आहे. चिरंतन सुगंधी आणि प्रफुल्लित टवटवीत राहणारे हे फुल असल्याने यांच्यामुळे दृष्टीदोष दूर होतो असे मानण्यात येते.
अशक्यप्राय गोष्टींचा, अशक्य कोटीतील गोष्ट, दुर्मिळ गुणांना, बऱ्याच गुलबकावलीच फुल म्हणत टोमणाही मारला जातो.
आजच तारा वनारसे यांची "गुलबकावलीचे फूल" ही कविता वाचण्यात आली.
माझे आधीपासूनच प्रत्येक प्राचिन लोककथांविषयी वेगळाच दृष्टीकोन आहे. भारतीय संस्कृतीवर जेंव्हा जेंव्हा हल्ले करण्यात. एक तर विषाणूं सारखं आपल्याच संस्कृतीत मिसळायचं भ्रम पैदा करायचा आणि त्यातून संकरीत नव्या अवतरणांसह (अवतार) नवी भाकडकथा भोळ्या भाबडया भारतीयांवर लादायची. त्या कथेतील पात्र, त्यांतील नायक अर्थात हेच कल्पानांचे महारथी यांचे विशेषसंबंधी असतात. खलनायक हे दूर्दैवाने इथला मुळ भारतीय आहे.
गुलबकावली ही लोककथा अरेबियांनी जरी लिहीली. जगभर पसरवली तरी जगातल्या प्रत्येक घडामोडीवर भारतीय संस्कृतीची छाप म्हणजे आमच्या भाषेत काळ्या दगडावरची रेघ आहे.
प्राचिनकथा, काव्य, महाकाव्य,चमत्कार,सण, उत्सव हे बहुजनांना मानसिक, धार्मिक, सांस्कृतिक गुलामगीरी लादण्याचे लक्षण आहे. त्यांनी बिनबुडाच्या कल्पनांना दैवी अवतार मानावे. त्याला पुजणाराच देशभक्त, अंधभक्त बाकी विद्रोह करणारे सारेच शुद्र, अपृश्य, देशद्रोही म्हणून फुकटची गुलामगीरीसाठी पिढयानपिढयाची आयतीच आरक्षीत सोय ठरलेलीच.
आता गुलबकावली या कथेला सर्वात जास्त पवित्र तामिळनाडू मध्ये मानले जाते. आर्यांचे द्रविडांवर आक्रमण ( इथले विचारवंत सांगतात त्यांचेच म्हणण्यानुसार ) काळातील बऱ्याचशा घटनांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या लोककथेवरही परिणाम झालेला स्पष्ट दिसतो आहे.
अखंड महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता तसेच महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवी या मातेला भेटण्यासाठी नारदमुनी आले. वंदन केले मातेनी सांगा नारदजी मी कशी दिसते असे विचारले असता. मुनींनी त्यांच्या नेहमीच्या शैलीनी वारेमाप स्तूती केली. आणि पण पोटात शिरवला.
माझ्यामते(😜) आखिल भारतातील पुर्वीच्या मातृसत्ताक पद्धतीत स्त्रीया या पण याच गोष्टींच्या जास्त आहारी गेल्याचे दिसतात.
एक पण- कदाचित दृढ़निश्चय, इच्छा, आशाआकांक्षा आणि स्वप्नयांबद्दल असावा. तर दुसरा पण हा लेकिन किंतू पणतु परंतू या प्रकारातला असावा.
कारण ( हा शोध मला लागलाय बरं, तेही लॉकडाऊन मध्ये कृपया कोरोना इतकंच यालाही मनावर घ्या)
जेवढे स्वयंवर झाले, त्यात राजकुमारीचा कांहींना कांही पण होता. कदाचित नवरदेवाची लायकी तपासण्यासाठी असावी.
आता स्त्रीयांच्या पोटात कांही रहात नाही हा पुर्वीचा समज कांही प्रमाणात लागू जरी पडत असला तरी बऱ्याचदा मातृसत्ताक राष्ट्र असूनही सर्वांत जास्त निंदानालस्ती स्त्रियांचीच केलीय, शुद्रांची, अस्पृशांची केलीय. आणि एक सांगतो खरंय का ते सांगा. मला फारसं कळत नाही मात्र जे वाटलं, पटलं ते विचारतो. आपण सर्वात जास्त टिका ही सरकारचीच करत असतो. (🤨🧐🤫😬🤭)
असो भरपूरविषयांतर झालं पण तेही गरजेचंच होतं. कारण माझी पोस्ट स्वयंघोषित बुध्दीवंतांसाठी नाहीय, विचारवंतासाठी नाहीय. माझी पोस्ट माझ्यासारख्याच विकसनशिल सजग सम्यकदृष्टीकोनातून विचार मांडणाऱ्या तमाम लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांसाठी आहे.
आणि हो कांहींना प्रसिद्धीसाठी शेण खायचा नवा ट्रेंड आणलाय अशांना कोपरापासूनच जोडतो रे बाबांनो.
तर आपली गोष्ट कंटीन्यू करू. नारदमुनींनी भवानीमातेच्या सौंदर्याची प्रशंसा केली. आणि पण... (किंतूचीच खेळी) मनात घातला.
माते आपले अलौकिक सौंदर्य पाहून धन्य झालो वगैरे. ( कविमनाला सुचतील तसे वर्णन) पण या सौंदर्यात एका गोष्टींची कमतरता आहे.
आता मातेच्या मनात हा किंतू आल्यावर ती बैचेन झाली. कोणती गोष्ट मुनीवर.
त्यावर नारदमुनींनी गेंदाफुलाची. म्हणत स्पष्ट केले.गेंदाफुलाविषयी इतके वर्णन केले. की ते मिळविण्यासाठी मातेला विवश केले.
आता होतं काय आमच्या बहुजनांला माते विषयी, देवांदिकांविषयी ब्र कधी काढायचा वा नाही याचे कांहींनी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केल्याचे समजते. धर्माचेनंतर जाती-जातीत, आणि शेवटी जातीतील पोटजातीत भेद निर्माण केलं की आमचा खेळ खल्लास हे कांहींना पक्कं माहित.
हे गेंदाफुल आणण्यासाठी अर्जुनाला चांभार बनावं लागलं. हे गेंदाफुल तक्षकनगरीचा राजा नागलोकांचा राजा शेषा याचेकडेच होता. आता ही कथा आणि गुलबकावलीची कथा पूर्णतः १००% एकसारखीच आहे. फक्त पात्र आणि प्रसंगाची अदलाबदल केलीय.
नागलोकांच्या संहारासाठी, द्रविडांच्या संहारासाठी ची या दोन कथा आहेत.
एकात गेंदाफुल तर दुसऱ्या कथेत लालखडा (नागमणी) म्हटले आहे.
एकात तक्षक राजा शेषा तर दुसऱ्यात भुजंग म्हटले आहे.शेषा म्हणे पाताळाचा राजा होता. जो हजार तोंडाचा होता.
ही गुलबकावली वेगळ्या पध्दतीनेच जवळपास शेषाची राजकन्या ऊल्पावंती असावी असे माझे वैयक्तिक मत आहे.
या उल्पावंतीशी श्री अर्जुनानी लग्न केले. आणि कृष्णकृत्याने हा गेंदाफुल हडप करुन मातेचरणी अर्पन केला. या नंतर पांडवांनी भवानी मातेला धर्मादेवी म्हणून प्रतिस्थापले.
अवास्तव, ओढून ताणून, तर्कविसंगद माहिती देणे, त्याचा प्रचार अन् प्रसार करणे वैयक्तिक मलाच पटत नाही.
परंतू या गोष्टीचा माझ्यावर लहानपणापासूनच विलक्षण प्रभाव झाला.
कदाचित दादा ( माझे कै. आजोबा) मला यातून कांही अविश्वसनिय संकेत देण्याचा प्रयत्न करत असावेत. अथवा या गोष्टींचे कांहीतरी paranormal activity सारखे कनेक्शन असावे.
योगायोग म्हणावे की काय.
१ ) मला लहानपणापासून या गुलबकावलीची गोष्ट आवडते. पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते.
२ ) ही गोष्ट माझे आजोबांमार्फत बऱ्याच जनांनी ऐकलेली होती.आजोबा म्हणे तमाशामध्ये सोंगाडयाचेही काम करायचे. वग सादर करायचे. माझ्यामते ते अपरिचित लोककलावंत होते.
३) आमुच्या गावात सर्वात आधीच्या मुळ गावकारभारातील महत्वाचे स्थान पुर्वीपासून आमच्याच घराकडे होते.आहे.
४) खरे तर फार वर्षापुर्वी म्हणजेच आमुच्या आजोबांच्याही आजोबांच्या काळात आम्ही अर्जूननगरहून इकडे स्थलांतरीत झालो.
५) अर्जूननगर हे पांडवांच्या काळातील अंजेंडू जवळील वस्ती होती जी आज गाव आहे. ( करमाळा.जि.सोलापूर) येथेच अर्जूनानी तहान लागल्याने बाण मारून पाण्याचा डोह तयार केला. तो अंजनडोह आज गाव आहे.
Comments
Post a Comment